VALLABHBHAI PATEL AND FLAG SATYAGRAHA
वल्लभभाई
पटेल आणि झेंडा
सत्याग्रह
Gajanan Borkar 1, Dr. Ganesh Khune 2
1 Research Student, Shivaji Mahavidyalaya
Gadchiroli, District Gadchiroli, India
2 Associate Professor, Mahatma Jyotiba
Phule Mahavidyalaya, Ashti, T. Chamorshi District Gadchiroli., India
|
|
ABSTRACT |
||
|
English: Gandhi was arrested after the suspension of the Non-Cooperation Movement. By this period, one of the leaders who emerged in Gandhi's mind was Vallabhbhai Patel. During Gandhi's imprisonment, he proved the effectiveness of Gandhian thought by opposing the powerful British government on the basis of his philosophy of truth and non-violence through the successful Flag Satyagraha movement. The first commander of this Satyagraha was Jamnalal Bajaj. After his arrest, the Congress executive asked Patel to take the responsibility of this movement. The experiences that Vallabhbhai Patel and other Satyagrahis had in the Nagpur Flag Satyagraha were very exciting and very rare. Future generations will be proud of his heroic story and will get the sacred inspiration of national service and patriotism. In the conduct of Nagpur Satyagraha, Shri Vallabhbhai's management skills, amazing courage, bravery, and extraordinary qualities of keeping people together are seen in the coordination of leadership. The initial soldier is eligible for the high and glorious position of a general in the future. It cannot be guessed today that Patel worked hard for the service of the country under the patronage of Gandhiji. Therefore, it is said that Shri Vallabhbhai was a person of immense courage, discipline, restraint and personality. Hindi: असहकार आंदोलनाच्या स्थगितीनंतर गांधींना अटक करण्यात आली. या कालावधीपर्यंत गांधींच्या मुशीतील निर्माण झालेल्या नेतृत्वापैकी एक म्हणजे वल्लभभाई पटेल होते. यांनी गांधींच्या कारावासातील काळात त्यांच्या सत्य, अहिंसा या तत्वज्ञानाच्या आधारावर बलाढ्य ब्रिटीश सरकारला विरोध करण्यासाठी गांधी विचाराची कृतिशीलता झेंडा सत्याग्रहाच्या यशस्वी आंदोलनातून सिद्ध करून दाखवलं. या सत्याग्रहाचे पहिले सेनापती जमनालाल बजाज होते त्यांच्या अटकेनंतर काँग्रेस कार्यकारिणीने पटेल यांना या आंदोलनाची जबाबदारी घेण्यास सांगितले. नागपूर झेंडा सत्याग्रहात वल्लभभाई पटेल आणि इतर सत्याग्रहींना आलेले अनुभव अतिशय रोमांचक आणि अत्यंत दुर्मिळ होते. त्यांच्या या शौर्यगाथेबद्धल भावी पिढ्यांना अभिमान वाटेल आणि देशसेवेची आणि देशभक्तीची पवित्र प्रेरणा मिळेल. नागपूर सत्याग्रहाच्या संचालनात श्री वल्लभभाईंचे व्यवस्थापन कौशल्य, अद्भूत धैर्य, शौर्य, लोकांना एकत्र ठेवण्याचे अलौकिक गुण नेतृत्वाचा समन्वय दिसून येतो. सुरवातीचा सैनिक भविष्यात सेनापतीच्या उच्च आणि गौरवशाली पदासाठी पात्र असतात. गांधीजींच्या आश्रयाने पटेल देशसेवेसाठी कठोर परिश्रम केले, याचा आज अंदाज लावता येणार नाही. म्हणून असे म्हटले जाते की श्री वल्लभभाई हे अफाट धैर्य शिस्तीचे संयमी आणि व्यक्तिमत्व होते. |
|||
|
Received 07 July 2025 Accepted 08 August 2025 Published 30 September 2025 DOI 10.29121/granthaalayah.v13.i9.2025.6469 Funding: This research
received no specific grant from any funding agency in the public, commercial,
or not-for-profit sectors. Copyright: © 2025 The
Author(s). This work is licensed under a Creative Commons
Attribution 4.0 International License. With the
license CC-BY, authors retain the copyright, allowing anyone to download,
reuse, re-print, modify, distribute, and/or copy their contribution. The work
must be properly attributed to its author.
|
|||
|
Keywords: National Flag, Satyagraha, Non-Cooperation Movement, Movement Management Skills, Bravery, Extraordinary Leadership Qualities of Keeping
People Together, Organizational Skills, राष्ट्रध्वज,
सत्याग्रह, असहकार
आंदोलन, चळवळ व्यवस्थापन
कौशल्य, अदभूत
धैर्य, शौर्य, लोकांना
एकत्र ठेवण्याचे
अलौकिक नेतृत्व
गुण, संघटन कौशल्य |
|||
1. प्रस्तावना
असहकार
आंदोलनादरम्यान
गांधीजींच्या
अटकेला १८ मार्च
१९२३ रोजी एक वर्ष
पूर्ण झाले. त्याच
दिवशी नागपुरात
पं सुंदरलाल यांच्या
नेतृत्वाखाली
राष्ट्रीय तिरंगा
झेंडा घेऊन मोठी
मिरवणूक काढण्यात
आली. पोलिसांनी
आणि त्यांच्या
इतर दहा साथीदारांना
पकडले आणि ध्वज
हिसकावून घेतला.
दुसऱ्या दिवशी
सर्वांची सुटका
झाली असली, तरी
जेव्हा सुंदरलालजींनी
ध्वज परत मागितला
तेव्हा त्यांना
पोलिस प्रशासनाकडून
सांगण्यात आले
की ध्वज जप्त करण्यात
आला असून तो परत
करता येणार नाही.
यावर त्यांनी आक्षेप
घेत हा राष्ट्रध्वजाचा
अवमान असून याच्या
निषेधार्थ जाळपोळ
करण्यात येणार
असल्याचे सांगितले.
त्याचे हे वक्तव्य
धमकीचे मानून त्याला
अटक करून न्यायालयाने
सहा महिन्यांची
शिक्षा सुनावली.
या अन्यायकारक
शिक्षेच्या निषेधार्थ
१३ एप्रिल १९२३
रोजी मध्य प्रदेशची
राजधानी असलेल्या
नागपुरात जालियनवाला
बाग दिनी राष्ट्रध्वजासह
मोठी मिरवणूक काढण्यात
आली. त्याला हाणून
पाडण्यासाठी जिल्हा
दंडाधिकारी, पोलीस
अधीक्षकांसह तगडा
पोलीस बंदोबस्त
सिव्हिल लाइन्स
येथे आधीच उपस्थित
होता. त्यांनी
बळजबरीने मोर्चा
रोखण्याचा प्रयत्न
केला असता, स्वयंसेवकांनी
परत जाण्यास नकार
दिला. त्यावर पोलिसांनी
त्यांचे झेंडे
हिसकावून घेत लाठीमार
केला आणि खाली
पडलेल्यांना ओढून
नाल्यात फेकले.
एवढेच नाही तर
नागपुरात पोलिसांनी
कलम १४४ लागू करून
१ मे १९२३ पासून
सिव्हिल लाईन्स
परिसरात राष्ट्रीय
तिरंगा ध्वजासह
मिरवणूक काढण्यास
बंदी घातली. या
घटनेने नागपूर
झेंडा सत्याग्रह
सुरू झाला.
राष्ट्रध्वजाच्या
संरक्षणाबाबत
विचार करण्यासाठी
नागपूर काँग्रेस
प्रांतिक समितीची
बैठक झाली. यामध्ये
राष्ट्रध्वजाचा
मान राखण्यासाठी
जोरदार आंदोलन
सुरू करण्याचा
निर्णय घेण्यात
आला. यामध्ये आडकाठी
आणण्यासाठी शासनाने
फौजदारी प्रक्रिया
संहितेचे कलम १४४ लागू
केले असल्याने
१ मे पासून हक्क
मिळविण्यासाठी
संघर्ष सुरू करण्यात
यावा. एक अहिंसक
सत्याग्रह सुरू
केला पाहिजे. या
सत्याग्रहाच्या
नेतृत्वाची जबाबदारी
सेठ जमनालाल बजाज
यांच्याकडे कार्यकारिणीने
दिली होती. या निर्णयाची
माहिती मिळताच
नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी
राष्ट्रीय तिरंगा
ध्वज असलेल्या
काँग्रेसच्या
मिरवणुकीवर बंदी
घालण्याचा आदेश
जारी केला. नागपुरात
राष्ट्रध्वजाच्या
प्रदर्शनावर असलेली
ही बंदी हा केवळ
नागपूरचाच नाही
तर संपूर्ण देशाच्या
प्रतिष्ठेचा प्रश्न
होता. जमनालाल
यांना अटक झाल्यानंतर
लगेचच अखिल भारतीय
काँग्रेस कार्यकारिणीची
नागपुरात बैठक
बोलावण्यात आली.
ज्या दिवशी ही
सभा नियोजित होती,
त्याच दिवशी जमनालाल
च्या खटल्याचा
निकाल जाहीर झाला,
त्यांना दोन वर्षांची
सश्रम कारावासाची
शिक्षा झाली. दुसऱ्या
दिवशी काँग्रेस
कार्यकारिणीने
ध्वज सत्याग्रह
सुरू ठेवण्याचा
ठराव मंजूर केला.
आता या लढाईचे
व्यवस्थापन सरदार
वल्लभभाई पटेल
यांच्याकडे सोपवण्यात
आले. कार्यसमितीच्या
निर्णयानंतर २२
जुलै १९२३ रोजी
नागपूरला पोहोचले.
वल्लभभाईंनी तयार
केलेल्या रणनीतीपुढे
सरकार फार काळ
टिकू शकले नाही.
भारतीय स्वातंत्र्य
लढ्याला गांधी
विचारातून उभारणी
देण्याकरिता झेंडा
सत्याग्रहाचे
पटेलांच्या नेतृत्वातील
यश महत्वपुर्ण
ठरले होते.
2. सत्याग्रहाची पार्श्वभूमी
नागपूर
ध्वज सत्याग्रहाचे
मूळ जबलपूर मधील
होते. ऑगस्ट १९२२
मध्ये हकीम अजमल
खान यांनी देशात
सविनय कायदेभंग
सुरू करण्याच्या
शक्यतेची चौकशी
करणाऱ्या समितीचे
सदस्य म्हणून जबलपूरला
भेट दिली. नगरपालिकेच्या
काँग्रेस सदस्यांना
टाऊन हॉलमध्ये
स्वागतपर भाषण
दिले त्यावर त्यांनी
राष्ट्रध्वज फडकावला.
या घटनेकडे ब्रिटिशांनी
त्यांच्या राजवटीचा
अपमान म्हणूनही
पाहिले. ब्रिटिश
संसदेच्या खासदारांची
मने संतापाने भरलेली
होती. भारताच्या
राज्य सचिवांना
खासदारांना आश्वासन
द्यावे लागले की
असे पुन्हा होऊ
दिले जाणार नाही.
मार्च १९२३ मध्ये,
काँग्रेस कार्यकारिणीची
जबलपूर येथे बैठक
होणार होती. तेव्हा
नगरपालिकेने टाऊन
हॉलवर राष्ट्रध्वज
फडकावण्याचा ठराव
पूर्वीप्रमाणेच
मंजूर केला. त्यास
जिल्हाधिकार्यांनी
परवानगी नाकारली.
जबलपूर
नगरपालिकेतील
काँग्रेस सदस्यांच्या
हस्ते राष्ट्रध्वज
फडकावण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी
ध्वज खाली उतरवण्याचे
आदेश दिले. राष्ट्रध्वजाचा
अवमान केल्याने
आंदोलनाची ठिणगी
पडली. नगरपालिकेतील
सर्व काँग्रेस
सदस्यांनी राजीनामे
दिले आणि जबलपूर
जिल्हा काँग्रेस
कमिटीने ताबडतोब
सत्याग्रह सुरू
केला. निषिद्ध
आदेशाचा अवमान
करत काँग्रेसच्या
स्वयंसेवकांनी
राष्ट्रध्वज समोर
आणि उंचावर घेऊन
मिरवणूक काढली.
या
समर्थनार्थ नागपूर
मध्ये पंडित सुंदरलाल
यांच्या नेतृत्वात
१८ मार्च रोजी
आंदोलन सुरू करण्यात
आले. क्रांतिकारक
आणि हिंदी कवयित्री
सुभद्रा कुमारी
चौहान यांचा समावेश
होता. १८५७ च्या
स्वातंत्र्ययुद्धातील
नायिका झाशीची
राणी लक्ष्मीबाई
यांच्यावर त्यांनी
हिंदीत सर्वात
प्रेरणादायी कविता
लिहिली होती या
दोघांना अटक करण्यात
आली. सुंदरलालला
सहा महिन्यांची
शिक्षा झाली. यावेळी
राष्ट्रध्वजाचा
सन्मान राखण्यासाठी
नागपूर जिल्हा
काँग्रेस मैदानात
उतरली. खऱ्या गांधीवादी
शैलीत हा निर्णय
जाहीरपणे करण्यात
आला, तसेच सदर बझारला
जाण्यासाठी मिरवणुकीचा
मार्गही सांगण्यात
आला, जेथे सिव्हिल
लाइन्समधून मिरवणूक
काढल्यानंतर एक
जाहीर सभा होणार
होती. १३ एप्रिलला
जालियनवाला बाग
दुर्घटनेच्या
वर्धापन दिनानिमित्त
ही मिरवणूक काढण्यात
आली होती. सिव्हिल
लाइन्सच्या प्रवेशावर
थांबवण्यात आले.
सत्याग्रह करण्यासाठी
दहा स्वयंसेवक
राष्ट्रध्वज हातात
धरून पुढे सरसावले.
त्यांना बेदम मारहाण
करण्यात आली तरीही
सत्याग्रही शांततेत
राहिले व पुढील
काळात आंदोलन यशस्वी
केले. काँग्रेसने
सत्याग्रहाचे
केंद्र जबलपूर
येथून प्रांतीय
राजधानीत नागपूरला
हलवून लढण्याचा
निर्णय घेतला.
3. पटेलांचे नेतृत्व
नेतृत्वाचे
गुण वल्लभभाईमध्ये
बालपणापासूनच
विकसित झाले होते.
महात्मा गांधींच्या
संपर्कात आल्यानंतर
सत्य आणि अहिंसाही
त्यांच्यात रुजली.
कायद्याचा सराव
करून त्यांनी व्यावहारिक
ज्ञानही मिळवले
होते. सत्य आणि
अहिंसेचे सर्वोच्च
तत्व प्रत्यक्ष
कृतीत आणून वल्लभभाईंनी
पुढे येणाऱ्या
प्रत्येक चळवळीत
उघडपणे भाग घेतला.
१९२३ च्या नागपूर
झेंडा सत्याग्रहाच्या
आंदोलनाच्या माध्यमातून
वल्लभभाई पटेल
यांना गांधीजींच्या
असहकार आंदोलनाचे
महत्त्व पटवून
देण्याची संधी
मिळाली. झपाट्याने
बदलणाऱ्या घटना
आणि राजकीय अस्थिरता
अशा परिस्थितीत
सरदार पटेल विधायक
कार्य आपल्या हातात
घेत होते, त्याच
दरम्यान राष्ट्राच्या
प्रतिष्ठेची परीक्षा
घेणारा नागपूर
ध्वज सत्याग्रह
आला. वल्लभभाईंनी
आयुष्यभर कठोर
परिश्रम घेतले.
म्हणून असे म्हटले
जाते की वल्लभभाई
हे अफाट धैर्य
आणि शिस्तीचे होते.
इतकेच नाही तर
जेव्हा महात्माजी
अगदी लहान व्यक्तीच्याही
जिज्ञासेला उत्तर
घ्यायची. म्हणून
पंडित माखनलाल
जी चतुर्वेदी म्हणतात
की, वल्लभभाईंना
प्रश्न विचारण्याचे
धाडस फार कमी जण
करू शकत होते. वल्लभभाईंची
शैली अशी होती
की शत्रूचे लोखंड
भले गरम असेल, पण
आपला हातोडा थंड
असला तेव्हाच उपयोगी
पडेल. म्हणूनच
ते ज्या क्षेत्रात
उतरलेत तेथे सर्वत्र
विजय मिळवला.
नागपूर
झेंडा सत्याग्रहाचे
पहिले सेनापती
जमनालाल बजाज होते.
त्यांच्या अटकेनंतर
काँग्रेस कार्यकारिणीने
वल्लभभाई पटेल
यांना त्याची जबाबदारी
घेण्यास सांगितले.
सत्याग्रहाची
जबाबदारी स्वीकारण्यासाठी
२२ जुलै रोजी नागपुरात
आल्यावर पटेल आंदोलनाच्या
पूर्वीच्या कार्यपद्धतीवर
समाधानी नव्हते.
स्वयंसेवकांची
छावणी पोलिसांच्या
ताब्यात होती.
तो स्वतः संघटित
मदतीशिवाय होती
आणि सर्वात महत्त्वाचे
म्हणजे भारताच्या
इतर भागातून स्वयंसेवकांची
व्यवस्था करावी
लागली. पटेल यांनी
मात्र एका मित्राला
लिहिले की, खरंच
हा एक प्रेरणादायक
संघर्ष आहे. देशातील
सर्वांचे लक्ष
नागपूरकडे वळवावे
लागे ल. तेव्हाच
गांधीमार्गाचे
महत्व सर्वाना
समजावून घ्यायची
संधी मिळेल.
4. सत्याग्रहाची व्यहरचना
१९२३
च्या नागपूर ध्वज
आंदोलनाच्या माध्यमातून
वल्लभभाई पटेल
यांना गांधीजींच्या
असहकार आंदोलनाचे
महत्त्व पटवून
देण्याची संधी
मिळाली. झपाट्याने
बदलणाऱ्या घटना
आणि राजकीय अस्थिरता अशा परिस्थितीत
सरदार पटेल विधायक
कार्य आपल्या हातात
घेत होते. त्याच
दरम्यान राष्ट्राच्या
प्रतिष्ठेची परीक्षा
घेणारा नागपूर
ध्वज सत्याग्रहाची
जबाबदारी त्यांच्याकडे
सोपविण्यात आली.
जमनालाल बजाज यांना
अटक झाल्यानंतर
लगेचच अखिल भारतीय
काँग्रेस कार्यकारिणीची
नागपुरात बैठक
बोलावण्यात आली.
काँग्रेस कार्यकारिणीने
ध्वज सत्याग्रह
सुरू ठेवण्याचा
निर्णय घेतला आणि
शारीरिक, भावनिक
आणि आर्थिक सर्व
प्रकारची मदत देण्याचा
ठराव मंजूर केला.
आता या लढाईचे
नेतृत्व वल्लभभाई
पटेल यांच्याकडे
सोपवण्यात आले.
कार्यसमितीच्या
निर्णयानंतर ते
२२ जुलै १९२३ रोजी
नागपूरला पोहोचले.
आंदोलनात सहभागी
होण्यासाठी गुजरातबाहेर
जाण्याची त्यांची
ही पहिलीच वेळ
होती. त्यांनी
नागपुरात तळ ठोकला.
तेथील परिस्थिती
त्यांनी नीट समजून
घेतली व विविध
प्रांतांतील समित्यांना
परिपत्रके पाठवून
स्वयंसेवक पाठविण्याचे
आवाहन केले.
मार्च
२०२३ पासून सुरु
झालेल्या या आंदोलनात
देशभरातून स्वयंसेवक
येत होती. १ मे पासून
मुलभूत हक्क बचाव
या विधायक चळवळीची
सुरवात केली. १८
जून १९२३ रोजी
होणारा सत्याग्रहानिमित्य
मोठा कार्यक्रम
आयोजिला होता त्यानुसार
सरकारने नागपूर
शहरातील सिव्हिल
लाईन्स वगळता महापालिका
क्षेत्रात मिरवणूक
व मेळावे घेण्यावर
बंदी घालण्यात
आली. कारण सत्याग्रह
कार्यक्रम थांबवणे हा त्याचा
उद्देश होता. त्यामुळे
जमनालालजी बजाज
आणि भगवानदिन यांना
१७ जूनच्या संध्याकाळी
अटक करण्यात आली.
इतकेच नाही तर
मध्यरात्रीनंतर
सत्याग्रहींच्या
छावणीला घेराव
घालण्यात आला आणि
१८ जून रोजी पहाटे
३.३० वाजता त्यात
उपस्थित असलेल्या
सुमारे २५० स्वयंसेवकांना
अटकही करण्यात
आली. त्यात विनोबा
भावेही होते. या
लोकांना अटक करण्यासाठी
फौजदारी प्रक्रिया
संहितेचे कोणते
कलम लावायचे, हा
प्रश्न प्रशासनासमोर
निर्माण झाला.
काँग्रेस नेते
जमनालाल आणि भगवानदिन
यांच्यावर कट वगैरे
अनेक कलमे लावण्यात
आली. मात्र स्थानिक
तसेच इतर राज्यातील
स्वयंसेवकांनी
अद्याप कोणताही
गुन्हा केलेला
नसल्यामुळे त्यांना
कोणत्या कलमाखाली
शिक्षा करायची
हा मोठा प्रश्न
होता. त्यांनी
फौजदारी प्रक्रिया
संहितेचे कलम १०९
शोधून काढले. हा
कायदा अशा लोकांसाठी
तयार करण्यात आला
होता की ज्यांच्याकडे
वरवर पाहता उदरनिर्वाहाचे
कोणतेही साधन नाही
आणि ज्यांना भटक्या
आणि बदमाश असल्याचा
संशय आहे. परंतु,
या अटक केलेल्या
कॉंग्रेस स्वयंसेवकांमध्ये
उच्च न्यायालयातील
वकील, अभ्यासू
शिक्षक, प्रतिष्ठित
व्यापारी आणि शेतकरी
होते आणि त्यांची
ओळख झाल्यावर नागपूरच्या
अधिकाऱ्यांनी
स्वत:ला दुर्दैवी
समजले असते, परंतु
त्यांच्यावर कलम
१०९ लादून म्हणजे
त्यांना भटके समजले.
स्वयंसेवक यांना
घेरले गेले आणि
पकडले गेले, तरीही
सत्याग्रही ध्वज
सैनिकांचा ओघ सुरूच
होता. मध्य प्रांतातून
तसेच इतर प्रांतातून
स्वयंसेवक नियमित
येत राहिले.
पटेल
यांची पहिली कृती
म्हणजे त्यांचे
फोर्स आयोजित करणे,
जे त्यांनी प्रांतांना
किती स्वयंसेवक
पाठवले पाहिजेत
आणि कोणत्या दिवशी
यावीत हे निर्दिष्ट
केले. स्वयंसेवक
दररोज येत राहावेत
जेणेकरुन किमान
पन्नास तरी रेल्वे
स्थानकावर अटकेसाठी
उपलब्ध होतील.
अशा प्रकारे देशाच्या
कानाकोपऱ्यातून
स्वयंसेवक नागपुरात
येऊ लागले आणि
त्यात सर्व समुदाय
आणि वर्ग शिक्षित
आणि अशिक्षित,
उच्च न्यायालयातील
वकील, शालेय शिक्षक,
महाविद्यालयीन
विद्यार्थी, तसेच
जमीनदार आणि व्यापारी
यांचा समावेश होता.
स्वयंसेवकांच्या
अभावी सरकार संघर्ष
लांबणीवर टाकेल
असे होऊ नये म्हणून
पटेलांनी महिलांना
चळवळीत सामील करून
घेण्याची योजनाही
आखली आणि त्यांनी
गांधींच्या पत्नी
कस्तुरबा यांना
संदेश पाठवला तुरुंगात
जाण्यास तयार व्हा.
आंदोलन अव्याहत
चालूच होते. स्वयंसेवकांनी
रोज सत्याग्रह
करून नागपूर तुरुंग
भरला दोन महिन्याच्या
प्रतिबंधात्मक
आदेशाची मुदत १७
ऑगस्ट रोजी संपणार
होती. त्याचे नूतनीकरण
होण्याआधी, पटेल
यांनी १६ तारखेला
एक निवेदन जारी
करून सरकारला आश्चर्यचकित
केले, ज्यात सत्याग्रहाबध्दल
प्रचाराविषयी
सरकारमध्ये काही
गैरसमज पसरवण्याचाप्रयत्न
केला गेला होता.
सरकार किंवा त्यांचे
राजकीय विरोधक
यांनी जनतेची उद्दिष्ट
आणखी चुकीचे ठरवू
नये म्हणून पटेल
यांनी जाहीर केले
की १७ तारखेला
नेहमीप्रमाणे
तीन स्वयंसेवकांच्या
तुकडीऐवजी पाच
स्वयंसेवकांची
मिरवणूक सदर बाजार
येथून निघेल सिव्हिल
लाइन्स..त्यांना
अधिकाऱ्यांनी
रोखले तर संघर्षाचा
नवीन टप्पा साकारण्यात
येईल. अशाप्रकारे
सरकारला कोंडीत
पकडले आहे, ही एक
चेतावणी होती.
पटेलांनी चतुर,
कुशल कृतीने सरकारला
अडचणीत आणले. म्हणून
गृह सदस्याने १६
तारखेलाच पटेल
यांची भेट घेतली
आणि १८ तारखेला
मिरवणूक सिव्हिल
लाइन्समधून जाऊ
देण्याची परवानगी
देऊन तोडगा काढला
आणि त्यानंतर काँग्रेसने
पटेलांच्या नेतृत्वातील
सत्याग्रह मागे
घेतला. त्यांनी
अटकेतील स्वयंसेवकाची
बिनशर्त सुटका
करण्यास सांगितले.
गृह सदस्याने यास
सहमती दर्शविली
आणि, राज्यपालांची
संमती मिळवून,
लिखित स्वरूपात
करार केला.
१७
तारखेला कोणताही
नवीन आदेश जारी
करण्यात आलेला
नाही. परंतु ब्रिटीश
पोलिस अधीक्षकांनी
त्यांची परवानगी
घेतल्याशिवाय
पोलिस कायद्यानुसार
सिव्हिल लाइन्समधून
मिरवणूक काढण्यास
मनाई केली. पटेलांनी
परवानगी घेण्याऐवजी,
त्यांनी १८ तारखेला
सिव्हिल लाइन्समार्गे
मिरवणूक काढण्याचा
आपला पत्राव्दारे
पोलिस अधीक्षकांना
कळविले, ज्यामध्ये
वेळ आणि मार्ग
दोन्ही सूचित केले.
दुपारी शंभर स्वयंसेवक
राष्ट्रध्वज घेऊन
निघाले. पोलीस
अधीक्षक हे बंदोबस्तातील
पोलिसांसोबत होते.
मिरवणुकितील लोक
ज्या ठिकाणी थांबले
त्याला आज झेंडा
चौक नाव मिळाले
आहे. पोलिसांच्या
रांगेत असलेल्या
संपूर्ण मार्गावर
जोरदार घोषणा दिल्यात.
सिव्हिल लाईन्समधील
चर्चसमोर मात्र
पूर्ण शांतता पाळण्यात
आली. हे पटेल यांच्या
युरोपीय समुदायाप्रती
असलेल्या सलोख्याच्या
वृत्तीचे घोतक
होते. पोलिसांनी
न थांबवता मिरवणूक
इच्छित स्थळी पोहोचली.
पटेल यांनी घोषित
केले की, राष्ट्रध्वजाचा
सन्मान कायम आहे.
सार्वजनिक रस्त्यावर
शांततापूर्ण आणि
शिस्तबद्ध पद्धतीने
मिरवणूक काढण्याचा
आमचा अधिकार बहाल
करण्यात आला आहे.
मी हा सत्य, अहिंसेचा
विजय मानतो. मी
आता घोषणा करण्याच्या
स्थितीत आहे की
या शुभ दिनी नागपूर
झेंडा सत्याग्रह
मोहीम सुसंगतपणे
यशस्वीरित्या
समाप्त झाली.
झेंडा
सत्याग्रह संपुष्टात
आणण्याची घोषणा
करताना, पटेल यांनी
आपला शब्द पाळला
होता. आता आपले
वचन पूर्ण करण्याची
पाळी सरकारच्या
गृह सदस्याची होती,
परतू काही सनदी
अधिकाऱ्यांच्या
खोडसर वृत्तीकडून
राज्यपाल, गृहसदस्य
आणि पटेल यांच्याशी
झालेल्या लेखी
करार नाकारण्याचा
प्रयत्न झाला व
पटेल हीच संधी
शोधत होते. पटेलांनी
आधीच स्वतःला लेखी
वचनबद्ध केले असल्याने,
सरकार कोंडीत पकडले
गेले. त्यामुळे
सत्याग्रही कैद्यांची
सुटका करण्याचा
त्यांनी भारत सरकारवर
दबाव आणला. तत्पुवी
स्वराज पक्षाने
एक अयशस्वी प्रयत्न
केला होता. सरकारला
असे वाटते की हा
तोडगा म्हणजे सरकारचा
पूर्ण पराभव, आणि
म्हणून त्यांनी
स्वयंसेवकाच्या
सुटकेला विरोध
केलेला दिसतो.
पटेलांनी आपले
मौन तोडायचे ठरवले.
त्यांनी प्रांतीय
सरकारला इशारा
देऊन शेवटचा धक्का
दिला की, येत्या
२४ तासांत स्वयंसेवाकाना
सोडले नाही, तर
राज्यपालांशी
केलेला पत्रव्यवहार
प्रकाशित करण्याशिवाय
त्यांच्याकडे
पर्याय उरणार नाही.
सत्याग्रह पुन्हा
सुरू करण्याची
धमकीही दिली. पटेलांच्या
या कृतीमुळे राज्यपाल
आणि गृहसदस्याच्या
प्रतिष्ठेला हानी
पोहोचली असती शेवटी
कोणताही पर्याय
न मिळाल्याने त्यांनी
राज्य सचिवांना
निर्धारित कालावधी
संपण्यापूर्वी
स्वयंसेवाक कैद्यांची
सुटका करण्यास
सहमती दर्शविली
व ३ सप्टेंबर रोजी
स्वयंसेवकांना
मुक्त करण्यात
आले. सत्याग्रहाचा
शेवट म्हणून त्यांनी
सिव्हिल लाइन्समधून
विजयी पदयात्रा
काढली आणि समोर
राष्ट्रध्वज फडकवला.
5. निष्कर्ष
नागपुरातील
झेंडा सत्याग्रहाच्या
वेळी महात्मा गांधी
तुरुंगात होते.
त्यांच्या अनुपस्थितीत
नागपूरचा सत्याग्रह
म्हणजे वल्लभभाई
पटेल यांच्या मेहनतीची,
त्यांच्या संघटनशक्तीची,
धैर्याची, शौर्याची,
संयमाची, सहिष्णुतेची,
नेतृत्वशक्तीची
आणि बुद्धिमत्तेची
परीक्षा आणि त्यातले
यश हे सर्व गुणांचा
उत्तम पुरावा ठरला.
नागपूरच्या काँग्रेस
कमिटीने अप्रतिम
आयोजन क्षमता दाखवली
आणि अथक प्रयत्न
केले. पवित्रता
आणि निर्भयतेच्या
या शस्त्रांनी
लढलेल्या या संघर्षाकडे
ते भविष्यातील
काळ अभिमानाने
मागे वळून पाहिलं.
सत्य, अहिंसा आणि
आत्मत्याग या शस्त्रांच्या
श्रेष्ठतेवर लोकांचा
विश्वास वाढेल.
नागपूर ध्वज सत्याग्रह
हा एक नागपूर येथेल विजय होता
असा दावा पटेलांनी
केला नाही तर झेंडा
सत्याग्रह गांधींच्या
विचारांचा प्रशिक्षणाची
पर्वणी होती. या
सत्याग्रहाने
राष्ट्रध्वजाची
प्रतिष्ठा मान्य
करण्यात आली. शांततेत
राष्ट्रध्वजासह
मिरवणूक काढण्याचा
जनतेचा अधिकार
आहे. सत्य, अहिंसा
आणि त्यागाने नागपूर
सत्याग्रहाचा
विजयी अंत झाला.
हा पटेलांच्या
यशाच्या शिरपेचात
मनाचा तुरा खोवला
गेला. राष्ट्रध्वजाच्या
सन्मानाने त्यांची
प्रतिष्ठा उंचावली.
राष्ट्रीय नेत्यांमध्ये
उच्च बळकट त्यांचे
स्थान निर्माण
झाले होते.
None.
None.
Chand, S. M., and Iqbal, F. (2010). Sardar Vallabhbhai Patel: Life and Ideas (सरदार वल्लभभाई
पटेल जीवन और विचार). Panchsheel Prakashan, 69–72.
Chopra, P. N. (1990). The Collected Works of Sardar Vallabhbhai Patel (Vol. I). Konark
Publishers Pvt. Ltd.
Gandhi, R. (2011). Patel: A life. Navjeevan Publishing House.
Krishna, B. (1995). Sardar Vallabhbhai Patel: India’s Iron Man. Indus Publisher India
Pvt. Ltd.
Krishna, B. (2011). Sardar Vallabhbhai Patel (सरदार वल्लभभाई
पटेल). Indus Source Books, 24–25.
Kumar, R. (1987). Sardar Patel’s Satyagrahi Life (सरदार पटेल
का सत्याग्रही
जीवन). Rajiv Prakashan Mandir,
39–41.
Limaye, M. (1993). Sardar Patel: Architect of an Organized State (सरदार पटेल:
सुव्यवस्थित राज्य
के प्रणेता सरदार
वल्लभभाई पटेल). D. T. Educational Society, 21–23.
Shastri, C. (1963). Nation-Builder Sardar Patel (राष्ट्रनिर्माता सरदार पटेल). Society for Parliamentary Studies, 16.
This work is licensed under a: Creative Commons Attribution 4.0 International License
© Granthaalayah 2014-2025. All Rights Reserved.